कराडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
कराड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरावरील पत्र उडून गेले आहेत, तर काही घरांची पडझड देखील झाली आहे.
सातारा : कराड तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरावरील पत्र उडून गेले आहेत, तर काही घरांची पडझड देखील झाली आहे. ऐन काढणीला आलेल्या रब्बी पिकाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. गहू हरभाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. पिकाचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिला झालाय.
Latest Videos