मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता
पुढील पाच दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गेला महिनाभर पावसाच्या प्रतिक्षेत गेल्यानंतर अखेर आषाढसरींनी मुंबईत दमदार हजेरी लावली. मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. दमदार पाऊस सुरू होताच शहरात पडझडीचे आणि पाणी साचण्याचे प्रकार झाले. पुढील पाच दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाकडून मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दक्षिण गुजरात तटपासून उत्तर कर्नाटक तटापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र आहे. त्यामुळे पुढील पाच दिवसांसाठी कोकण किनारपट्टीला मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गुरुवारी दिवसभर पडत असलेल्या पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेबरोबरच रस्ते वाहतुकीलाही बसला.
Published on: Jul 01, 2022 12:13 PM
Latest Videos