Nagpur | नागपुरात मुसळधार पाऊस पडला, सखल भागात साचलं पाणी

Nagpur | नागपुरात मुसळधार पाऊस पडला, सखल भागात साचलं पाणी

| Updated on: Sep 21, 2021 | 3:27 PM

नागपूरात सकाळपासून मुसळाधार पाऊस पडला, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. नागपूरातील नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्याने, वाहतुक बंद करण्यात आलीय. या पुलाखालील पाण्यात काही काळ स्टार बसेसंही बंद पडल्या होत्या.

नागपूरात सकाळपासून मुसळाधार पाऊस पडला, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचलंय. नागपूरातील नरेंद्र नगर पुलाखाली पाणी साचल्याने, वाहतुक बंद करण्यात आलीय. या पुलाखालील पाण्यात काही काळ स्टार बसेसंही बंद पडल्या होत्या…. पावसामुळे नरेंद्र नगर पुलाखालील पाणी साचल्याने, नाहतूक बंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं तुडुंब भरले आहेत. उमरेड तालुक्यातील वडगांव धरणं 97 टक्के भरले आहेत. त्यामुळं धरणाचे 3 गेट उघडण्यात आले आहे. यातून 507 क्यूसेव पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसंच नांद धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. सध्या पाऊस थांबलाय, त्यामुळं कुठलाही धोका नाही, मात्र पुन्हा मुसळधार पाऊस झाल्यास पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.