बुलढाण्यात पुराच्या पाण्यानं अनेक गावांना फटका, कित्येक संसार उध्वस्त अन् झालं होत्याचं नव्हतं!
VIDEO | बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा अतिवृष्टी, घरासह अन्नधान्यांच मोठं नुकसान; प्रशासनाला अद्याप जागच नाही
बुलढाणा, 29 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्याला या पावसाच्या पाण्याचा चांगलाच फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात पाऊस आला आहे. सातपुडा पर्वत रांगेमध्ये झालेल्या पावसानं पुन्हा एकदा लेंडी नदीला परवा रात्री पूर आला होता. त्या पुराचे पाणी नदी शेजारी असलेल्या आलेवाडी गावातही घुसलं, आलेवाडी गावात अनेक घर पाण्याखाली गेली. आधी झालेल्या पुराच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा आलेवाडी गावाला पावसाच्या पाण्याने जोरदार तडाखा दिला आहे. मोठ्या प्रमाणात घरातील साहित्य, अन्नधान्य वाहून गेले आहे. काल दुसऱ्या दिवशी मोठ्या हिमतीने आलेवाडी गावातील लोक आपल्या घरात साचलेला गाळ बाहेर काढत आहे. मात्र प्रशासनाची कुठलीच मदत अद्याप आलेवाडी गावातही पोहचलेली नाही.