Thane Rain | मुंबईत पावसाचा जोर वाढला, ठाणे-मुंब्रा दरम्यान वाहतूककोंडी
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका ठाणे, मुंब्रा ,कळवा शीळ फाटा ,कल्याण फाटा या ठिकाणी देखील बसला आहे.
सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका ठाणे, मुंब्रा ,कळवा शीळ फाटा ,कल्याण फाटा या ठिकाणी देखील बसला आहे. सखोल भागात शीळ फाटा या ठिकाणी पाणी साचले चित्र दिसून येत आहे ,मात्र दोन दिवसापूर्वी ज्या पद्धतीने शीळ फाटा आणि कल्याण फाटा या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागला होता . मुसळधार पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर नदीचा स्वरूप आलं होतं मात्र आज ती परिस्थिती नसून वाहतूक व्यवस्थित सुरळीत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. त्यामुळे चाकरमान्यांना व इतर दळणवळण करणाऱ्या मोठ्या गाड्यांना आपापल्या ठिकाणी पोहोचता येत आहे.
Latest Videos