Nagpur Heavy Rain | नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक सखल भागात पाणी साचलं
नागपूरात एक दिवसाच्या मुसळधार पावसानं प्रशासनाचे दावे फोल ठरलेय. काल दिवसभर झालेल्या मुसळाधार पावसामुळे नागपूरातील विविध भागात पाणी साचलं, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असून, रस्ते जलमय झाले होते.
नागपूरात एक दिवसाच्या मुसळधार पावसानं प्रशासनाचे दावे फोल ठरलेय. काल दिवसभर झालेल्या मुसळाधार पावसामुळे नागपूरातील विविध भागात पाणी साचलं, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं असून, रस्ते जलमय झाले होते. काल शहरात 92 मीमी पावसाची नोंद झालीय, या पावसानं शहरातील 30 ते 35 भागात पाणी चाललं आणि लोकांना मनस्ताप सहन करावा लागला. मनीष नगर अंडरपास, प्रतापनगर रिंगरोडजवळ, नरेंद्र नगर पुलाखाली, अशोक चौक, यशोधानगर येथील नवदेवी नगर झोपडपट्टी, पारडी भागातील एचबी टाऊन… यासह शहरातील अनेक सखल भागात पावसाचं पाणी साचल्याने लोकांची मोठी गैरसोय झालीय. पावसाळी पाण्याचं नियोजन करण्यासाठी नागपूर महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करतात. तरिही मोठा पाऊस झाला की शहरात विविध ठिकाणी पाणी साचतेय. सिमेंट रस्त्यामुळे पावसाचं पाणी जायला जागा नसल्याने, नागपूरातील बऱ्याच भागात पाणी साचतेय.