Nanded Rain | नांदेडच्या किनवटमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रस्ते पाण्याखाली

Nanded Rain | नांदेडच्या किनवटमध्ये मुसळधार पाऊस, अनेक रस्ते पाण्याखाली

| Updated on: Aug 19, 2021 | 3:15 PM

नांदेड जिल्ह्यातील किनवट इथे पैनगंगा नदीला पूर आलाय, किनवट शहराजवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहतेय. त्यामुळे किनवट- उमरखेड या मार्गावरची वाहतूक ठप्प पडलीय. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल असून पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहतेय. सध्या या भागात पावसाचा जोर वाढलाय,

नांदेड जिल्ह्यातील किनवट इथे पैनगंगा नदीला पूर आलाय, किनवट शहराजवळ असलेल्या पुलावरून पाणी वाहतेय. त्यामुळे किनवट- उमरखेड या मार्गावरची वाहतूक ठप्प पडलीय. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल असून पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहतेय. सध्या या भागात पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय, त्यामुळे कमी उंचीच्या या पुलावरून पाणी वाहतेय.

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम आहे. दिवसभरात मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून राज्यांतील विविध जिल्ह्यांना कुठे यलो अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.उद्या महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.