Palghar | पालघरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, भात पेरणीच्या कामांचा वेग,बळीराजा समाधानी
पालघरमध्येही सकाळापासूनच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघरच्या पूर्वपट्ट्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर, मनोर, बोईसर, डहाणू, कासा, विक्रमगड, वाडा परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे.
पालघरमध्येही सकाळापासूनच ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघरच्या पूर्वपट्ट्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पालघर, मनोर, बोईसर, डहाणू, कासा, विक्रमगड, वाडा परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तर दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला असून भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. येत्या 15 तारखेपर्यंत हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
Latest Videos