यूपी-बिहार, उत्तराखंडला मुसळधार पावसाचा फटका, कुठं रेल्वे रूळ हवेत तर कुठं भयानक भूस्खलन?
उत्तराखंडच्या चमोलीत भूस्खलन झालं. यामुळे जोशीमठ, बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आलाय. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील काही रेल्वे रूळांचं हवेत रुपांतर झालंय. मुसळधार पावसामुळे पुलाखाली टाकलेला मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे नागरिक या रेल्वे रूळाचा पूल म्हणून वापर करताना दिसताय.
उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या तीन राज्यांना मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. जोरदार होत असलेल्या पावसामुळे रेल्वे रूळ आणि पूल पाण्याखाली जाण्याचं सत्र कायम आहे. तर उत्तराखंडमध्ये भीषण भूस्स्खलनाची घटना घडली आहे. उत्तराखंडच्या चमोलीत भूस्खलन झालं. यामुळे जोशीमठ, बद्रीनाथ महामार्ग बंद करण्यात आलाय. तर दुसरीकडे उत्तरप्रदेशातील काही रेल्वे रूळांचं हवेत रुपांतर झालंय. मुसळधार पावसामुळे पुलाखाली टाकलेला मातीचा भराव वाहून गेला. त्यामुळे नागरिक या रेल्वे रूळाचा पूल म्हणून वापर करताना दिसताय. अशा रुळामुळे रेल्वे वाहतूक धोकादायक असल्याने रेल्वे वाहतूकच बंद करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील लखीमपूर भागाला पावसाचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले. शारदा नदीला आलेल्या पूरामुळे रेल्वे रूळच गायब झाला आहे. पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.