Rain | महाराष्ट्र राज्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

| Updated on: Oct 05, 2021 | 4:55 PM

मोसमी पाऊस या आठवड्यात राजस्थानमधून परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

परतीचे वेध लागलेल्या मान्सूनने सोमवारी रात्री पुणे जिल्ह्याला चांगलाच तडाखा दिला. अतिमुसळधार पावसामुळे अवघ्या एक ते दोन तासांमध्ये पुण्यातील अनेक भाग जलमय झाले होते. पावसाचा हा प्रचंड जोर पाहून अनेकांना धडकी भरली होती. येत्या चार दिवसांमध्ये राज्याच्या इतर भागांनाही पावसाचा असाच तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.