मुंबई-नाशिक महामार्गावर दिवस उगवताच वाहतूक कोंडी; भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा, कारण तरी काय?

मुंबई-नाशिक महामार्गावर दिवस उगवताच वाहतूक कोंडी; भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा, कारण तरी काय?

| Updated on: Apr 21, 2023 | 9:40 AM

VIDEO | मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्य़ा प्रवाशांना दिवसाच्या सुरूवातीलाच करावा लागतोय वाहतूक कोंडींचा सामना, काय आहे कारण?

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन धारकांना दिवसाच्या सुरूवातीला वाहतूक कोंडीचा सामना करायला लागल्याचे पाहायला मिळाले. दिवसाच्या सुरूवातीला सकाळीच दीड ते दोन तास नितीन कंपनी येथील पुलावर एक कंटेनर बंद पडल्याने मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. या पुलावर कंटनेर बंद पडल्याने वाहतूक कोंडी मोठी झाली होती तर ठाण्यातील नितीन कंपनीपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचेही चित्र सकाळी पाहायला मिळाले. विकेंड असताना नागरिक आपली कामं उरकत असताना मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Published on: Apr 21, 2023 09:40 AM