नाशिकमध्ये भाजप अन् शिवसेनेत रंगली श्रेयवादाची लढाई, पुन्हा बॅनरबाजी, काय आहे प्रकरण?
VIDEO | नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि देवयानी फरांदे यांच्या रंगली श्रेयवादाची लढाई, बघा का केली बॅनरबाजी?
नाशिक : नाशिकमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या पक्षांच्या आमदार आणि खासदार यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगत असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे नाशिकच्या इंदिरानगर आणि राणेनगर या भागातील अंडरपासची लांबी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला आहे. मात्र याच निधीवरून आता शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींचे श्रेयाचे होर्डिंग्ज इंदिरानगर आणि राणेनगर या भागात झळकत आहे. निधी मिळविण्यासाठी आपणच पाठपुरावा केल्याचा दावा हे दोन्ही नेते करत आहे. नाशिककरांची वाहतुकीची कोंडी मिटणार, खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठपराव्याला यश आले असल्याचा आशय शिवसेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर म्हटले आहे तर नाशिकच्या इंदिरानगर आणि राणेनगर या भागातील अंडरपासची लांबी वाढविण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला असून भाजप आमदार देवयानी फरांदे यांचं देखील याचे देखील श्रेय असल्याचे भाजपकडून लावण्या आलेल्या बॅनरवर म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये बॅनवर चर्चा झाल्याचे पाहायला मिळत आहे.