एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना हायकोर्टाचा झटका, थेट जन्मठेप
11 नोव्हेंबर 2006 या दिवशी राम नारायणविश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभैया यांची फेक एन्काउंटरद्वारे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. या प्रकऱणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मुंबई, १९ मार्च २०२४ : मुंबई हायकोर्टाकडून एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठा झटका देण्यात आला आहे. लखनभैय्या फेक एन्काउंटर प्रकरणात प्रदीप शर्मा यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. ही शिक्षा सुनावल्यानंतर प्रदीप शर्मा यांना येत्या तीन आठवड्यात आत्मसर्पण करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाकडून देण्यात आले आहे. मुंबई हायकोर्टाने या प्रकरणातील इतर आरोपींनादेखील जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 11 नोव्हेंबर 2006 या दिवशी राम नारायणविश्वनाथ गुप्ता उर्फ लखनभैया यांची फेक एन्काउंटरद्वारे हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. याच प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरु होती. दरम्यान या प्रकऱणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रदीप शर्मा यांच्यासह त्यांच्या 12 सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने त्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.