Uday Samant | मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कॉलेज सुरु करण्याचा विचार : उदय सामंत
कुलगुरूंकडून माहिती आल्यानंतर आम्ही टास्क फोर्सकडे जावू, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महाविद्यालय सुरु करण्याच्या आम्ही तयारीत आहोत असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
रत्नागिरी : महाविद्यालयीन मुलांसाठी महत्वाची बातमी. कारण महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांचे महाविद्यालय सुरु होणार आहे. त्यामुळे काॅलेज सुरु होणार या तयारीमध्ये विद्यार्थांनी रहावे असं सांगत महाविद्यालय सुरु होणार असे सष्ट संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. तीन दिवसांपूर्वी कुलगुरूंसोबत चर्चा झाली आहे. कशा पद्धतीने काॅलेज सुरु करू शकतो, किती टक्केवारीवर आपण फिजिकली काॅलेज सुरु करु शकतो याचा अहवाल मागवला आहे. येत्या आठ दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे कुलगुरूंना आदेश दिले गेले आहेत. कुलगुरूंकडून माहिती आल्यानंतर आम्ही टास्क फोर्सकडे जावू, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महाविद्यालय सुरु करण्याच्या आम्ही तयारीत आहोत असे संकेत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
Latest Videos