‘हिजाब न घातल्यानं महिलांवर बलात्कार होतो’, कर्नाटकातील काँग्रेस नेते जमीर अहमद यांचं वादग्रस्त वक्तव्य
कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जमीर अहमद म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. हिजाबमुळे महिलांचे सौंदर्य दिसत नाही. तसंच महिलांनी हिजाब परिधान न केल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो, असं वादग्रस्त विधान जमीर अहमद यांनी केलं आहे.
कर्नाटकातील हिजाब वादाचे पडसाद महाराष्ट्र आणि देशभरात उमटत आहेत. अनेक सत्ताधारी आणि विरोधी नेते यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशावेळी कर्नाटकमधील काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जमीर अहमद म्हणाले की, इस्लाममध्ये हिजाब याचा अर्थ पडदा, असा आहे. हिजाबमुळे महिलांचे सौंदर्य दिसत नाही. तसंच महिलांनी हिजाब परिधान न केल्यास त्यांच्यावर बलात्कार होतो, असं वादग्रस्त विधान जमीर अहमद यांनी केलं आहे.
भारतात बलात्कार ही मोठी समय्या आहे. बलात्काराचे कारण काय? महिलांवर बलात्कार होण्याचे कारण म्हणजे त्यांना पडद्याआड न ठेवणे. हिजाब घालण्याची पद्धत आजपासून नाही आणि ती गरजेचीही नाही. ज्याला घालायचे आहे, सुरक्षित राहायचे आहे. ज्या महिलेला स्वत:चे सौंदर्य इतरांना दाखवायचे नाही, त्या हिजाब घालतात. हिजाब घालणे सक्तीचे नाही, तो वर्षानुवर्षे घातला जात आहे, असं जमीर अहमद यांनी म्हटलंय.