क्षणार्धात भलीमोठी बिल्डिंग पत्त्यांसारखी कोसळली; कंगनाच्या मतदारसंघातील थरारक VIDEO तुम्ही पाहिला?
अवघ्या 7 सेकंदात इमारत कोसळून काही मिनिटांत पुरात गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिल्डिंग कोसळण्याच्या घटनेत अनेक जण दबले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील समेज खाड परिसरात ढगफुटीमुळे 19 लोक बेपत्ता झाले आहेत.
हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे क्षणार्धात संपूर्ण बिल्डिंग होत्याची नव्हती झाली आहे. पावसामुळे चक्क संपूर्ण बिल्डिंग कोसळली आहे. बिल्डिंग कोसळण्याच्या घटनेत अनेक जण दबले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बिल्डींग कोसळतानाचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. इतकंच नाहीतर मुसळधार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात घरच्या घर वाहून गेली आहे त्यामुळे अनेक जण बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे आज सकाळी एक इमारत कोसळून पार्वती नदीत वाहून गेली. अवघ्या 7 सेकंदात इमारत कोसळून काही मिनिटांत पुरात गायब झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर भागातील समेज खाड परिसरात ढगफुटीमुळे 19 लोक बेपत्ता झाले आहेत. हिमाचल प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार ते अति मुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.