खाने का पिने का और झोपने का, दुसरं क्या काम है तिकडं?; मनोज जरांगे पाटील यांचं छप्परफाड हिंदी ऐकलं का?
समस्त मराठा समाजासाठी लढणारे आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ईराला पेटलेले मनोज जरांगे पाटील आता २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनीच मुंबईला धडकणार आहे. २० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह सुरू करणार
मुंबई, १८ जानेवारी २०२४ : समस्त मराठा समाजासाठी लढणारे आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी ईराला पेटलेले मनोज जरांगे पाटील आता २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनीच मुंबईला धडकणार आहे. २० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटीपासून पद यात्रा मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसह सुरू करणार आहे. दरम्यान, २० जानेवारीच्या आत आरक्षण मिळाल्यास गुलाल घेऊन किंवा उपोषणासाठी मुंबईला जाणार असल्याचा चंग मनोज जरांगे पाटील यांनी बांधलाय. २० जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यापूर्वी जरांगे पाटील पून्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मंगळवारी बच्चू कडू यांनी सगसोयरे या शब्दाचा मसुदा घेऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. ज्यात काही बदल जरांगेंनी सुचवले त्यामुळे सुधारित मसुदा घेऊन बच्चू कडू पुन्हा एकदा जरांगे पाटील यांना भेटणार आहे. मात्र यादरम्यान टिव्ही ९ ने मुंबईतील आमरण उपोषणाचा मार्ग आणि तयारी कशी आहे असा हिंदीतून प्रश्न केला असता जरांगेंनी छप्परफाड हिंदीतून अफलातून मुलाखत दिली. एकदा नक्की बघा मनोज जरांगे काय म्हणाले?