भाजपचं हिंदु प्रेम बेगडी, सत्तेसाठी हिंदुत्वाचा वापर करतं; ‘त्या’ निर्णयावरून टीकेची झोड
Hindu Mahasangh Anand Dave : मेघालय , नागालँड निवडणूक आणि सत्तास्थापनेवरून हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी भाजपला सवाल केलाय. पाहा व्हीडिओ...
पुणे : मेघालय , नागालँड निवडणूक आणि सत्तास्थापनेवरून हिंदू महासंघाच्या आनंद दवे यांनी भाजपला सवाल केलाय. ईशान्य भारतात भाजपने हिंदू विरोधी पक्षासोबत जाऊन काय साध्य केलं?, असा सवाल आनंद दवे यांनी भाजपला विचारला आहे. भाजपचं हिंदु प्रेम हे बेगडी आहे. सरकार स्थापण्यासाठी भाजपची काँग्रेस होत असल्याची टीका आनंद दवे यांनी केली आहे. भाजप आपलं हिंदुत्व सत्तेसाठी किंवा सत्तेवर येण्यासाठीच वापरतं हे आता उघड झालं आहे. ईशान्य भारतात भाजपने हिंदू विरोधी पक्षासोबत जाऊन काय साध्य केलं?, असं दवे म्हणाले आहेत.
Published on: Mar 09, 2023 01:12 PM
Latest Videos