Hindustani Bhau ला Mumbai सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

| Updated on: Feb 17, 2022 | 6:58 PM

पोलीस कोठडी संपल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ हा न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर झाल्याने अखेर आता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : अखेर हिंदुस्थानी भाऊ (Hindusthani Bhau) ऊर्फ विकास पाठक (Vikas Pathak) याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने विकास पाठक (Mumbai Sessions Court) याला जामीन मंजूर केला. धारावीमधील विद्यार्थी आंदोलनाप्रकरणात विकास पाठक याला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. अटक करून हिंदुस्थानी भाऊला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावणी, त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत पुन्हा एक दिवसांची वाढ करण्यात आली. पोलीस कोठडी संपल्यानंतर हिंदुस्थानी भाऊ हा न्यायालयीन कोठडीत होता. अखेर त्याला 30 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. याबाबत हिंदुस्थानी भाऊचे वकील अनिकेत निकम यांनी माहिती दिली आहे. हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याला जामीन मंजूर झाल्याने अखेर आता त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.