कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांचा लाठीचार्ज तर इंटरनेट सेवाही ठप्प
VIDEO | हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापुरात बंदची हाक अन् मोर्चावर लाठीचार्ज, काय कारण?
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटसवरून वाद निर्माण झाल्यानंतर आज सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. तसेच मोर्चा काढणार असल्याचंही हिंदुत्ववाद्यांनी जाहीर केलं. तर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी आधीच जमाव बंदीचे आदेश लागू केले होते. मात्र, हे आदेश झुगारुन हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र आले. जमाबंदी आदेश आणि पोलिसांनी बंद मागे घेण्याचं केलेलं आवाहन झुगारून हे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान, कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. शहरात शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना परिस्थिती त्वरीत नियंत्रणात आणण्याचे निर्देश केले आहे. यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.