संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार? हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी स्पष्टचं सांगितले...

संतोष बांगर यांच्यावर कारवाई होणार? हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी स्पष्टचं सांगितले…

| Updated on: Jan 26, 2023 | 2:00 PM

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संतोष बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर संतोष बांगर यांनी प्राचार्यांना मारहाण केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर कॉलेजच्या प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात असताना हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कारवाई होणार की नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यात उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, जयंत पाटील यांनी कोणाचा राजीनामा मागितला मला माहिती नाही. मात्र या संदर्भात पोलिसांकडून मी माहिती घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही.आत्ता तो व्हिडीओ कसा आहे काय आहे? त्या प्रचार्याविरोधात महिलांनी माझ्याकडे येऊन तक्रार केली आहे. आमच्यावर आरोप प्रत्यारोप झाले आहेत. चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना दिला. त्याच्यावर जिल्हाधिकारी माहिती घेऊन कार्यवाही करतील. पण जोपर्यंत कुणी तक्रार करणार नाही तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीवर गुन्हा होत नाही.

Published on: Jan 26, 2023 02:00 PM