आमदार संतोष बांगर थेट उतरले गुडघाभर पाण्यात, 4 महिन्यांच्या बाळासह 20 हून अधिकांचं केलं रेस्क्यू
हिंगोलीत मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचले असून शहरातील रस्त्यावर कमरेपर्यंत पाणी साचून वाहनं पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. पावसाचे पाणी शहरातील रेल्वे उडान परिसरातील केमिस्ट भवनातही शिरले असून त्याचबरोबर अनेक मॉलमध्ये पाणी शिरले आहे.
हिंगोली जिल्ह्यासह शहरात गेल्या २४ तासांहून अधिक काळ मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे हिंगोलीत बऱ्याच भागातील घरांमध्ये पाणी भरलं असून शेत पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. हिंगोलीतील भोगाव, पिंपळदरी, टाकळगव्हाण यासारख्या काही भागात पाणी साचलं आहे. येथील नद्यांनी आपली पातळी ओलांडली त्यामुळे गावा-गावात आणि शेतात गुडघाभर पाणीच पाणी साचलं आहे. हिंगोलीतील एका शेतात २२ शेतकरी अडकून पडले होते. त्या शेतकऱ्यांची हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि एनडीआरएफच्या रेस्क्यू पथकाकडून त्यांना रेस्क्यू करण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना आणि घाबरलेल्या तरूणांसह चार महिन्यांच्या बाळाची स्वतः आमदार संतोष बांगर यांच्याकडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बघा व्हिडीओ…