संतोष बांगर भडकले? मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत? नेमकं काय घडलं? सांगतायत स्वतः बांगर!
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे अनेकदा चर्चेत असतात. शिवसेनेचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.
कृष्णा सोनारवाडकर, मुंबईः हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंत्रालयातील (Vidhanbhavan) कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचं समोर आलं आहे. संतोष बांगर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही मंत्रालय परिसरात गोंधळ घातल्याचे म्हटले जात आहे. यावर संतोष बांगर यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली. टीव्ही 9 शी बोलताना बांगर म्हणाले, तेथील कर्मचाऱ्यांनी (police constable) आधी मला ओळखलं नाही. त्यांनी नंतर मला कोणत्याही
माझा पीए माझ्यासोबत होता. मी त्यांना सांगितलं तुम्ही रजिस्टरमध्ये एंट्री करा. तर सदर कर्मचारी मला रजिस्टरमध्ये एंट्री करा, असं म्हणत होते. यापलिकडे तिथे कोणत्याही प्रकारची हुज्जत घातली गेली नाही, असं संतोष बांगर म्हणाले.
पाहा संतोष बांगर काय म्हणाले-
त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. ते चेक करा, तुम्हाला दूध का दूध पानी का पानी कळून येईल, असं बांगर म्हणालेत.
गुरुवारी मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी संतोष बांगर यांना रोखलं. आधी रजिस्टरमध्ये एंट्री करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्यासोबत काही कार्यकर्तेदेखील होते. मात्र पोलिसांनी रोखल्यामुळे संतोष बांगर भडकल्याची माहिती समोर आली होती.
पोलीस कर्मचारी आणि बांगर तसेच समर्थक यांच्यात काहीकाळ वादावादी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र संतोष बांगर यांनी आज टीव्ही9 शी बोलताना हे आरोप फेटाळून लावले आहेत.
हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे अनेकदा चर्चेत असतात. शिवसेनेचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. एकनाथ शिंदे गटात सध्या बांगर आहेत.
एकनाथ शिंदेंसह अगदी सुरुवातीच्या टप्प्यात बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये ते नव्हते. उलट शिंदेंच्या बंडानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळावी, यासाठी हिंगोलीत मोठी रॅली काढली होती.
मात्र काहीच दिवसात तेदेखील शिंदे गटात शामील झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळीच त्यांनी आपण शिंदे गटात येत असल्याचं जाहीर केलं .