'गद्दार गटात जर कोणी मर्द असेल तर...', संतोष बांगर यांच्या 'त्या' टीकेला अयोध्या पोळ यांचं चॅलेंज

‘गद्दार गटात जर कोणी मर्द असेल तर…’, संतोष बांगर यांच्या ‘त्या’ टीकेला अयोध्या पोळ यांचं चॅलेंज

| Updated on: May 20, 2023 | 12:38 PM

VIDEO | हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आमदार संतोष बांगर विरूद्ध अयोध्या पोळ यांच्यात सामना

हिंगोली : हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आमदार संतोष बांगर विरूद्ध अयोध्या पोळ यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळत आहे. आमच्या महिला कार्यकर्त्या अयोध्या पोळ यांच्याविरोधात आक्रमक आहेत. आमच्या महिला कार्यकर्त्यां तिला मारण्याची तळतळ करत आहे. आम्ही तिला मारतो असं महिला कार्यकर्त्या म्हणाल्या, पण मी त्यांना म्हणलो शांत बसा, असे संतोष बांगर यांनी म्हटलंय कर मला हात लावून दाखवा, असे म्हणत अयोध्या पोळ यांनी संतोष बांगर यांना थेट आव्हान दिलं आहे. संतोष बांगर यांनी त्यांच्या एका भाषणात अयोध्या पोळ यांच्यावर नाव न घेता टीका केल्याचे पाहायला मिळाले. तिला एका मोठ्या साहेबांनी सांगितलं की तू संतोष बांगर सोबत खेटत राहिली तर आमदार होणार. पण ही खेटायची सुद्धा लायकीची नाही, तिला दुसरा धंदा राहिला नाही, असं खोचक भाष्यही संतोष बांगर यांनी केलं. तर संतोष बांगर यांच्या टीकेला आयोध्या पोळ यांनी देखील प्रतिआव्हान दिल्याचं पाहायला मिळालं. हिंगोली जिल्ह्यातील गद्दार गटात माझ्या दादुड्यासह जर खरचं कोणी मर्द असेल तर तो मला इजा करेल अन्यथा गद्दार गटात माझ्या दादुड्यासह एकही मर्द नाही हे सिद्ध होईल, असे म्हणत अयोध्या पोळ यांनी पुन्हा एकदा संतोष बांगर यांना डिवचलं.

Published on: May 20, 2023 12:38 PM