पठ्ठ्याचा डाव फसला, छत्रपती शिवरायांचा 'हा' ऐतिहासिक किल्ला स्वतःच्या नावावर करायला गेला अन्...

पठ्ठ्याचा डाव फसला, छत्रपती शिवरायांचा ‘हा’ ऐतिहासिक किल्ला स्वतःच्या नावावर करायला गेला अन्…

| Updated on: Nov 03, 2023 | 3:26 PM

शिवरायांच्या ऐतिहासिक किल्ल्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाचे बनावट कागदपत्र तयार करून ती जागा एकाने स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. बनावट लेटर आणि स्वाक्षरी केलेले कागदपत्र आढळून आल्याने उडाली खळबळ

कल्याण, ३ नोव्हेंबर २०२३ | छत्रपती शिवाजी महाराज यांचं आणि त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक ऐतिहासिक किल्ल्याचं नातं सर्वांनाच माहिती आहे. कल्याण शहरात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक ऐतिहासिक किल्ला आहे. कल्याण शहारात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आढळून येतात. त्यापैकीच एक कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला दुर्गाडी किल्ला आहे. मात्र या किल्ल्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाचे बनावट कागदपत्र तयार करून ती जागा एकाने स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्याचा फसला आहे. याप्रकरणी बनावट कागदपत्र तयार करून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले होते. कागदपत्र तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटर आणि स्वाक्षरी केलेले कागदपत्र आढळून आले आणि एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Nov 03, 2023 03:22 PM