ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी, सगळं जळून खाक अन्…. बघा सध्या काय परिस्थिती?
Keshavrao Bhosale Natyagruha Fire : कोल्हापुरातील नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. लागलेल्या आगीनंतर केशवराव नाट्यगृहाची विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचं मोठं नुकसान यामध्ये झालं आहे. जवळपास तीन ते चार तास ही आग पेटतच होती. अजूनही ही आग धुमसत आहे.
कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृहाचं मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने केशवराव भोसले या नाट्यगृहात कोणताही कार्यक्रम नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुढाकाराने केशवराव भोसले हे नाट्यगृह उभारण्यात आलं होतं. शंभर वर्षांची परंपरा असलेले नाट्यगृह जळून खाक झाल्याचे पाहून अभिनेत्यांना आपले आश्रू अनावर झाले आहे. ही आग कोणत्या कारणाने लागली. याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. मात्र केशवराव भोसले नाट्यगृहात असलेल्या गॅस पाईप लिकेज होऊन ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. 9 ऑगस्ट रोजी केशवराव भोसले यांची जयंती होती. त्याच्या पूर्वसंध्येला ही आगीची घटना घडली. ही भीषण आग लागल्याने आणि आगीच्या भडक्यामुळे त्या ठिकाणी आता सभागृहाचा फक्त सांगडाच राहिला आहे. दरम्यान, या नाट्यगृहाच्या १०० मीटर परिसरात सामान्य नागरिकांना बंदी घालण्या आली आहे.