HMPV Virus in Maharashtra : चिंता वाढली; 7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला लागण, महाराष्ट्रात कुठे संशयित रूग्ण?

HMPV Virus in Maharashtra : चिंता वाढली; 7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला लागण, महाराष्ट्रात कुठे संशयित रूग्ण?

| Updated on: Jan 07, 2025 | 2:14 PM

ह्युमन मेटान्यूमो नव्या व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. नागपूर येथे मेटा न्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन संशयित रूग्ण आढळून आले आहेत.

चीन या देशात कोरोना व्हायरस नंतर आता ह्युमन मेटान्यूमो व्हायरस वेगाने पसरू लागल्याचे पाहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत ६ बाधित रुग्ण आढळले असून अहमदाबादमध्ये १, बेंगळुरूमध्ये २, चेन्नईत २ आणि कोलकात्यात १ अशा मेटा न्यूमोव्हायरसची (एचएमपीव्ही) लागण झाली आहे. अशातच या नव्या व्हायरसने महाराष्ट्रात शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. नागपूर येथे मेटा न्यूमोव्हायरसचे (एचएमपीव्ही) दोन संशयित रूग्ण आढळून आले आहेत. नागपुरात एका 7 वर्षीय मुलाला आणि 13 वर्षीय मुलीला या विषाणूची लागण झाल्याचा संशय आहे. दोन्ही मुलांना मेटा न्यूमोव्हायरसची लक्षण दिसत होती. आता या दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आहे. दरम्यान, “पालकांनी चिंता करण्याची गरज नाही, हा व्हायरस कोरोनासारखा नाही. माईल्ड आहे”. शक्य असल्यास मुलांनी मास्क घालावा, असे आवाहन नागपूर येथील शासकीय वैद्यकीय आणि रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी केले आहे.

Published on: Jan 07, 2025 02:14 PM