HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा... HMPV व्हायरसच्या बचावासाठी अशी घ्या काळजी

HMPV Virus : तुम्हाला ‘ही’ लक्षणं दिसताच सावध व्हा… HMPV व्हायरसच्या बचावासाठी अशी घ्या काळजी

| Updated on: Jan 07, 2025 | 1:03 PM

चीनमध्ये HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसची नागरिकांना लागण झाली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने एंट्री केली आहे.

कोरोना व्हायरस नंतर पुन्हा एकदा चीनच्या एका नव्या व्हायरसने भारतात एन्ट्री केली आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये कोरोनाची धडकी भरलेली असताना पुन्हा एकदा भारतीयांची चिंता वाढली आहे. चीनमध्ये HMPV अर्थात ह्युमन मेटा न्यूमो व्हायरसची नागरिकांना लागण झाली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने एंट्री केली आहे. कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1, पश्चिम बंगालमध्ये 1 आणि तामिळनाडू राज्यात 2 प्रकरणे समोर आली आहेत. तर राज्यात नागपूरमध्ये एक 13 वर्षांची मुलगी आणि एक 7 वर्षाच्या मुलीत ही लक्षणं दिसली आहे. सतत दोन दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळतेय. या नव्या व्हायरसची तीव्रता ही कोरोनापेक्षा कमी असल्याने व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूदरही कमी आहे. या नव्या व्हायरसची लागण झाल्यानंतर सर्दी सतत नाकातून पाणी येणं, शिंका येणं, घसा खवखवणे, खोकला, ताप येणं अशी लक्षणं दिसून येतात. बघा यासंदर्भातील व्हिडीओ

Published on: Jan 07, 2025 01:03 PM