87 एसआरपीएफ, 30 हजारांवर होमगार्ड तैनात, पोलीस महासंचालकांनी सांगितला प्लान!
राज्यातील कायदा व राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम असून कोणतीही जातीय तेढ निर्माण झाल्यास आम्ही त्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे.
राज्यातील कायदा व राज्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) सक्षम असून कोणतीही जातीय तेढ निर्माण झाल्यास आम्ही त्यावर कडक कारवाई करू, असा इशारा पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. राज्यात रमजान ईद (Ramadan Eid) आणि अक्षय्य तृतीयेच्या (Akshay Tritiya) पार्श्वभूमीवर सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. राज्यातील लोकांनीही यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी दिला आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ आणि होमगार्ड राज्यात तैनात केल्या आहेत, अशी माहिती पोलीस महासंचालकांनी दिली आहे.
Published on: May 03, 2022 02:52 PM
Latest Videos