Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Video | गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

| Updated on: Feb 03, 2024 | 2:14 PM

भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे महेश गायकवाड यांच्या गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढल्या आहेत. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच हे प्रकरण घडल्याने या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई | 3 फेब्रुवारी 2024 : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा परिणाम राज्यातील महायुती सरकारवरही झाला आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जखमी झाले आहेत. यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधी पक्षांनी टीका सुरु केली आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची आता चौकशी करण्याचे आदेश डीजींना दिले आहेत अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाचा अत्यंत वरिष्ठ पातळीवरुन करण्यात येणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महेश गायकवाड यांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्या काढण्यात आल्या असल्या तरी त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

Published on: Feb 03, 2024 02:12 PM