Raj Thackeray यांना 33 हजार विहिरींचा पेनड्राईव्ह दिला’ – Dilip Walse Patil

| Updated on: Mar 15, 2022 | 12:00 AM

मागच्या अधिवेशनात आपण एक 6.5 चा पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी एक पेनड्राईव्ह दिला. आज एक पेनड्राईव्ह दिला. आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?, असा खोचक सवालही वळसे-पाटील यांनी फडणवीसांना विचारलाय.

फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देताना वळसे-पाटील म्हणाले की, आपण भाषण करत असताना सांगितलं की स्टिंग ऑपरेशन झालं. ते 125 तासांच आहे. त्यातून अनेक गोष्टी पुढे येतील असं तुम्ही सांगितलं. मला माहिती आहे की तुम्ही काहीच डाटा अध्यक्षांकडे दिलाय, अजून बराच तुमच्याकडे बाकी आहे. त्यात जशी जशी गरज लागेल तसं तुम्ही काढाल न काढाल मला माहिती नाही. मात्र, मला या निमित्तानं एकच गोष्ट सांगायची आहे की, तुमचा आरोप काही जरी असला तरी मी कुणाची पाठराखण करणार नाही. परंतु हे प्रकरण आपल्याला तपासावं लागेल. या घटनेच्या मागे नक्की कोण आहे? आणि ही घटना कशाप्रकारे पुढे घेऊन जायची? यात कोण दोषी आहे? त्यांच्यावर काय कारवाई करायची? पण मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे. आपण एकदा मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंना 33 हजार विहिरींचा जलयुक्त शिवारचा पेन ड्राईव्ह दिला होता. मागच्या अधिवेशनात आपण एक 6.5 चा पेनड्राईव्ह दिला. दोन दिवसांपूर्वी एक पेनड्राईव्ह दिला. आज एक पेनड्राईव्ह दिला. आपण काय एखादी डिटेक्टिव्ह एजन्सी काढली की काय?, असा खोचक सवालही वळसे-पाटील यांनी फडणवीसांना विचारलाय.