अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?

अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?

| Updated on: Dec 14, 2024 | 11:13 AM

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या सरकारमधील नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार आहे. अशातच सूत्रांकडून महायुती सरकारमधील खात्यांसंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे.

येत्या १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन नागपुरात होणार आहे. यापूर्वी १५ तारखेला नागपुरातच मंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या सरकारमधील नव्या मंत्र्याचा शपथविधी होणार आहे. अशातच सूत्रांकडून महायुती सरकारमधील खात्यांसंदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थखातं असणार आहे. तर फडणवीस अर्थखातं भाजपमध्येच दुसऱ्या कोणालातरी देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. त्यापैकी महसूल खातं हे एकनाथ शिंदे शिवसेनेतच दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकतात. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभागाचं खातं असणार आहे. त्यापैकी अजित पवार हे राष्ट्रवादीतच दुसरं खातं देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार याकडे राजकीय नेत्यांसह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. अखेर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आणि १५ तारखेला नागपुरातच मंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी कोणाकोणाची मंत्रिमंडळात वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Published on: Dec 14, 2024 11:12 AM