मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित

मोफत जेवण दिलं नाही म्हणून हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण; अखेर ‘तो’ पोलीस अधिकारी निलंबित

| Updated on: Dec 25, 2021 | 10:50 AM

मुंबईमध्ये मोफत जेवन दिले नाही म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. अखेर या प्रकरणात आता त्याचे निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई : मोफत जेवन दिले नाही म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. विक्रम पाटील असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. अखेर या प्रकरणात विक्रम पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. पाटील हे सांताक्रूझमधील वाकोला पोलीस स्टेशनमध्ये  (Vakola Police) सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज व्हायरल होताच त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते.