Amazon : तुमच्या दारापर्यंत डिलिव्हरी पोहोचवणारं 'ॲमेझॉन' कसं काम करतं?

Amazon : तुमच्या दारापर्यंत डिलिव्हरी पोहोचवणारं ‘ॲमेझॉन’ कसं काम करतं?

| Updated on: Sep 09, 2024 | 3:46 PM

कोणतीही वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणं हे अवघ्या काही मिनिटांचं काम आहे. पण ती वस्तू तुम्हाला घरपोच देण्यासाठी अनेक लोकांची मेहनत असते. 'ॲमेझॉन'वरून तुम्ही वस्तू ऑर्डर करत असाल तर हा व्हिडीओ नक्की पाहा.

हल्ली सणासुदीला किंवा इतर सर्वसामान्य दिवशीही बाजारात जाऊन सामानाची खरेदी करण्याचं प्रमाण बऱ्याच अंशी कमी झालंय. मोबाइल आणि डिजिटलच्या जमान्यात आता एका क्लिकवर तुम्हाला हवी असलेली वस्तू घरपोच मिळते. वस्तू छोटी असो किंवा मोठी.. अवघ्या काही दिवसांत तर कधीकधी अवघ्या 24 तासांत ती तुमच्या दारावर हजर असते. यामागे मोठं ई-कॉमर्स काम करतंय. कोणतीही वस्तू ऑनलाइन ऑर्डर करणं अत्यंत सोपं आहे. पण त्यामागे किती लोकांची मेहनत असते, ऑनलाइन शॉपिंगची यंत्रणा कशी काम करते, ते तुम्हाला या व्हिडीओत जाणून घेता येईल. ‘ॲमेझॉन डॉट इन’ हा सध्या देशातील सर्वांत मोठा ई-कॉमर्स व्यवसाय आहे. देशभरातील लाखो ग्राहक ‘ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ची आतुरतेने वाट पाहत असतात. या ॲमेझॉनची सुरुवात कशी झाली, हा व्यवसाय कसा वाढत गेला याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून पाहुयात..

 

 

Published on: Sep 09, 2024 03:45 PM