मराठा समाजाला कसं मिळू शकतं आरक्षण? आरक्षण देण्याचे पर्याय नेमके काय?

मराठा समाजाला कसं मिळू शकतं आरक्षण? आरक्षण देण्याचे पर्याय नेमके काय?

| Updated on: Sep 03, 2023 | 12:25 AM

VIDEO | मराठा समाजाला आरक्षण देण्याचे पर्याय नेमके काय? मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेमक्या कोणत्या हालचाली झाल्यात बघा मराठा आरक्षणावर टीव्ही ९ मराठीचा EXCLUSIVE रिपोर्ट

मुंबई, २ सप्टेंबर २०२३ | जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर हे आंदोलन चर्चेत आलं. मात्र मराठा आरक्षणाची नेमकी स्थिती काय आहे. तर मराठा समाजाला नेमकं आरक्षण कसं मिळू शकतं. ५ मे २०२१ ला सुप्रीम कोर्टाकडून आरक्षण रद्द करण्यात आलं. नोकरीमध्ये १२ टक्के, शैक्षणिक १२ टक्के आरक्षण होतं. तर मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक मागास सिद्ध होत नाही, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं होतं. यासह आरक्षणाची मर्यादा ५० टक्के पेक्षा वाढवता येणार नाही, असं कोर्टाने म्हटलं होते. आणीबाणीची स्थिती सांगून गायकवाड समितीने आरक्षणाची मर्यादा का वाढवली हेही सांगितलं नाही, असेही कोर्टानं म्हटले. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नेमक्या कोणत्या हालचाली झाल्यात बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 03, 2023 12:24 AM