पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना कसं मिळालं ? संजय राऊत म्हणाले यासाठी २००० कोटी…
गेल्या सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाही. ही डील आहे. हा सौदा आहे. हे सरकार खोक्यातून निर्माण झाले आहे. नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवले गेले आहेत.
मुंबई : गेल्या सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी मोठा सौदा करण्यात आला आहे. हा न्याय नाही. ही डील आहे. हा सौदा आहे. हे सरकार खोक्यातून निर्माण झाले आहे. नगरसेवकांचे भाव शहरानुसार ठरवले गेले आहेत. अनेक गोष्टी विकत घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रही विकत घेतील. शिवसेना या चार अक्षरांसाठी हा सौदा झाला आहे. नगरसेवक आणि शाखाप्रमुख 50 लाख, आमदार 50 कोटी, खासदार 100 कोटी असे ज्या पक्षाने दिले त्याने शिवसेना आणि धनुष्यबाण ताब्यात घेण्यासाठी किती मोठा सौदा केला असेल याचा हिशोब लागणार नाही. हा हिशोब करण्यासाठी 100 ऑडिटर लागतील. 2000 कोटी यासाठी खर्च झाले. ही माहिती त्यांच्याच बिल्डरांनी मला दिली. मी माझ्या मतावर ठाम आहे, असा सर्वात मोठा आणि गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.