असं कसं आक्रीत घडलं ? अध्यक्षाच्या निवडीवरून उपाध्यक्षांना पडला प्रश्न ? माझ्यावर अविश्वास आणि…
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दोन्ही बाजूस वकील जोरदार युक्तिवाद करत आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते. उपाध्यक्ष पदावरील नरहरी झिरवळ हेच विधानसभेचा कार्यभार सांभाळत होते.
नाशिक : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दोन्ही बाजूस वकील जोरदार युक्तिवाद करत आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकार गेले त्यावेळी विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते. उपाध्यक्ष पदावरील नरहरी झिरवळ हेच विधानसभेचा कार्यभार सांभाळत होते. सुप्रीम कोर्टात अपात्र आमदारांना अत्यंत कमी दिवसांची नोटीस बजावण्यात आली, असा युक्तिवाद करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना नरहरी झिरवळ म्हणाले, ज्या सभागृहाने माझी उपाध्यक्षपदी निवड केली. त्याच सभागृहात माझ्याविरोधात अविश्वास ठराव येणे अपेक्षित आहे. मेलवरून मला पाठवलेली नोटीस हा अविश्वास ठराव असेल आणि त्यानंतर घेतलेले निर्णय योग्य नसतील तर आमदार अपात्रतेची कारवाई जशी अयोग्य ठरेल तशीच माझ्या उपस्थितीत झालेला नव्या अध्यक्षांचा शपथविधी कसा वैध धरता येईल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Published on: Feb 17, 2023 05:18 PM
Latest Videos