एकनाथ शिंदेंच बंड नेमकं कसं घडलं? पहा ग्राफिक्सच्या माध्यमातून
देशातील राजकीय वर्तुळाला हादरे देणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या बंडाची सुरुवात मुंबईतून झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आमदारांच्या काही गाड्या ठाण्यात येऊन थांबल्या.
देशातील राजकीय वर्तुळाला हादरे देणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या बंडाची सुरुवात मुंबईतून झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आमदारांच्या काही गाड्या ठाण्यात येऊन थांबल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातच्या दिशेने निघाले. वलसाडपर्यंत शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या गाड्यांना पोलिसांचं संरक्षण नव्हतं. मात्र गुजरात सीमेत प्रवेश करताच त्यांना पोलिसांचं संरक्षण मिळालं. सूरतमध्ये 12 तास काढल्यानंतर रात्री दीड दरम्यान स्पाइस जेटचं एक स्पेशल विमान सूरतच्या विमानतळावर उतरलं. नंतर रात्री तीन दरम्यान शिवसेनेचे आमदार एअरपोर्टकडे निघाले. सूरतच्या एअरपोर्टवरून सेना आमदारांना घेऊन सव्वा तीनच्या सुमारास विमानानं टेक ऑफ केलं. सकाळी पावणेसातच्या सुमारास हे विमान गुवाहाटीत लँड झालं.
Published on: Jun 22, 2022 03:41 PM
Latest Videos