‘मविआ’ची चाचपणी, ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याकडे किती जागा मागणार?
Special Report | महाविकास आघाडीची चाचपणी, प्रकाश आंबेडकर यांना किती जागा मिळणार? बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : महाविकास आघाडीतील तिनही पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये गेल्या वेळी लढलेल्या 19 जागांचा आढावा घेण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडून प्रस्ताव मागवल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडी सुरु आहेत. ठाकरे गटानं महाराष्ट्रातील 18 आणि दादरा नगर हवेलीतील 1 जागा अशा एकूण 19 जागांवर दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचीही बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या जागांचा आढावा घेण्यात आलाय. दुसरीकडे महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांकडून, लोकसभेच्या जागांची चाचपणी सुरु झालीय. राष्ट्रवादीच्या बैठकीत गेल्या वेळी लढलेल्या 19 जागांचा आढावा घेण्यात आला. 2019 मध्ये लढलेल्या लोकसभेच्या 19 जागांचा आढावा राष्ट्रवादीनं घेतलाय. सध्याची परिस्थिती आणि कोण इच्छुक आहेत, त्याचीही माहिती घेण्यात आलीय. 2019 मध्ये ज्या 18 जागा शिवसेनेनं जिंकल्या होत्या. त्या 18 जागा आम्ही पुन्हा निवडून आणणार, असं ठाकरे गटाकडून वारंवार सांगितलं जातंय. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे आम्हीच मोठे भाऊ असल्याचं म्हटलंय.