मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?

मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?

| Updated on: Sep 23, 2024 | 10:59 AM

मंकीपॉक्स हा संसर्गजन्य रोज असून प्रामुख्याने तो संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याशी थेट संपर्क साधून पसरतो. हा रोग संक्रमित व्यक्तीच्या जखमा, द्रव किंवा त्या व्यक्तीच्या संक्रमित सामग्रीच्या संपर्कातूनही पसरू शकतो. याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या..

भारतात मंकीपॉक्सचा पहिला संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंकीपॉक्स कसा पसरतो, त्याची शरीरावर कोणती लक्षणं दिसतात आणि त्याचा प्रतिबंध कसा करता येईल, याविषयी जागरूकता निर्माण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आफ्रिकेतून आलेला हा विषाणू हा युरोप आणि अमेरिकेतही पोहोचला आहे. मंकी पॉक्सच्या विषाणूचा संसर्ग माकड, उंदीर, खार अशा सस्तन प्राण्यांना होऊ शकतो. सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी किंवा उडणारे पक्षी यांनाही विषाणूचा संसर्ग होऊ शकतो की नाही हे अद्याप उघडकीस आलेलं नाही. अनेक प्राण्यांमध्ये जरी मंकी पॉक्सचा संसर्ग होत असला तरी त्यांच्या शरीरावरुन त्याची लक्षणे दिसतीलच असं नाही. हा आजार नेमका कसा पसरतो आणि त्याचा संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात..

Published on: Sep 23, 2024 10:59 AM