उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना किती? सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना किती? सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं

| Updated on: Jan 17, 2023 | 11:50 AM

उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मग इतर भावांचे काय? ठाकरे परिवारातील लोक कुठे आहेत?

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे ( UDDHAV THACKERAY ) यांच्या शिवसेना गटाने निवडणूक आयोगासमोर पक्ष प्रतिनिधी सभा घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार ( SUDHIR MUNGANTIWAR ) यांनी ठाकरे गटाला चांगलाच टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बहुमत आहे हे बरोबर आहे. पण, उद्धव ठाकरे यांच्याकडे काय पुरावे आहे ते ही पहायला हवे. निवडणूक आयोगाने सर्व बाजू ऐकून तर्काच्या आधारावर सत्याच्या बाजूने निर्णय करावा, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात की हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे. मग इतर भावांचे काय? ठाकरे परिवारातील लोक कुठे आहेत? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विचार केला तर १/३ पार्टी विचार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे आणि २/३ विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

Published on: Jan 17, 2023 11:50 AM