Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण? पाहा संपूर्ण प्रश्नांची सविस्तर उत्तरे
नीलकमल बोटीला झालेल्या अपघातप्रकरणी कुलाबा पोलिसांनी तपास सुरू केला असून तज्ज्ञांच्या मदतीने बोटीची तपासणी करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीत बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून एलिफंटाला जाण्यासाठी निघालेल्या ‘नीलकमल’ या बोटीतील प्रवाशांसाठी बुधवारचा दिवस काळा दिवस ठरला. या बोटीतून 100 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. दुपारी 4 वाजताच्या सुमारास या बोटीला अचानक नौदलाच्या एका स्पीड बोटीने जोरदार धडक दिली. या धडकेनं नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली. या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला, तर किमान 98 जण जखमी झाले. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बोटीवरील सुविधांचा अभाव, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्यांची सुरक्षा.. असे सवाल उपस्थित केले जात आहेत. बोटीचा हा अपघात कसा झाला, त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या, याबद्दलचा हा सविस्तर व्हिडीओ…
Published on: Dec 22, 2024 10:42 AM
Latest Videos