AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | निहार ठाकरेंचे नातलग वेगवेगळ्या चार पक्षात कसे आहेत

Special Report | निहार ठाकरेंचे नातलग वेगवेगळ्या चार पक्षात कसे आहेत

| Updated on: Aug 02, 2022 | 12:10 AM

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिनाताई ठाकरेंची एकूण ३ मुलं. सर्वात मोठे बिंदूमाधव ठाकरे, दुसरे जयदेव ठाकरे आणि सर्वात धाकटे उद्धव ठाकरे. बिंदूमाधव यांच्या पत्नी माधवी ठाकरे.उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे. आणि जयदेव ठाकरेंची ३ लग्नं झाली. पहिल्या पत्नी जयश्री ठाकरे, दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे आणि तिसऱ्या पत्नी अनुराधा ठाकरे. जयदेव ठाकरेंना पहिल्या पत्नीपासून जयदेव मुलगा आहे. दुसऱ्या पत्नीपासून राहुल आणि ऐश्वर्य नावाची दोन मुलं आणि तिसऱ्या पत्नीपासून माधुरी नावाची मुलगी. उद्धव आणि रश्मी ठाकरेंना आदित्य आणि तेजस ठाकरे ही दोन मुलं आहेत. दिवंगत बिंदुमाधव ठाकरेंना नेहा नावाची एक मुलगी आणि निहार ठाकरे नावाचा एक मुलगा आहे. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदा जर कुणी शिंदे गटाला पाठिंबा दिला असेल, तर ते हेच निहार ठाकरे आहेत.

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत(Eknath shinde) दिसणारे हे आहेत निहार ठाकरे. अनेकांना माहिती नसेल, पण हे निहार ठाकरे(Nihar Thackeray) म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे नातू आहेत. निहार ठाकरेंचा हा फोटो आणि त्यांचे सद्या वेगवेगळ्या ४ पक्षात असलेल्या नातलगांची चर्चा जोरात सुरुय.
निहार ठाकरेंचे नातलग वेगवेगळ्या चार पक्षात आहेत.

आता भविष्यात निहार ठाकरेंनी जर राजकारणात प्रवेश केला., आणि समजा शिंदे गटाला जवळ केलं., तर निहार ठाकरे हे पहिला ठाकरे
असतील, की ज्यांचे एकाचवेळेस वेगवेगळे ५ नातलग वेगवेगळ्या पक्षात सक्रीय राहतील.

बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिनाताई ठाकरेंची एकूण ३ मुलं. सर्वात मोठे बिंदूमाधव ठाकरे, दुसरे जयदेव ठाकरे आणि सर्वात धाकटे उद्धव ठाकरे. बिंदूमाधव यांच्या पत्नी माधवी ठाकरे.उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे.
आणि जयदेव ठाकरेंची ३ लग्नं झाली. पहिल्या पत्नी जयश्री ठाकरे, दुसऱ्या पत्नी स्मिता ठाकरे आणि तिसऱ्या पत्नी अनुराधा ठाकरे.
जयदेव ठाकरेंना पहिल्या पत्नीपासून जयदेव मुलगा आहे. दुसऱ्या पत्नीपासून राहुल आणि ऐश्वर्य नावाची दोन मुलं आणि तिसऱ्या पत्नीपासून
माधुरी नावाची मुलगी. उद्धव आणि रश्मी ठाकरेंना आदित्य आणि तेजस ठाकरे ही दोन मुलं आहेत. दिवंगत बिंदुमाधव ठाकरेंना नेहा नावाची एक मुलगी आणि निहार ठाकरे नावाचा एक मुलगा आहे. ठाकरे घराण्यातून पहिल्यांदा जर कुणी शिंदे गटाला पाठिंबा दिला असेल, तर ते हेच निहार ठाकरे आहेत.

कारण, निहार ठाकरेंचे सासरे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आहेत.निहार यांचं लग्न हर्षवर्धन पाटलांची मुलगी अंकिता पाटलांसोबत झालंय
उद्धव ठाकरे हे निहार ठाकरेंचे सख्के काका आहेत आणि राज ठाकरे हे निहार ठाकरेंचे चुलत काका. आता यापैकी निहार ठाकरेंचे सासरे हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहेत. मात्र विशेष म्हणजे निहार ठाकरेंचे सासरे जरी भाजपत असले, तरी पत्नी अंकिता पाटील मात्र काँग्रेसमध्येच आहेत. कारण त्या सध्या पुणे जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या सदस्या आहेत. निहार ठाकरेंचे सख्खे काका उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि चुलत काका राज ठाकरे मनसेचे अध्यक्ष.

बाळासाहेब ठाकरेंच्या घराण्यात सध्या उद्धव ठाकरेंचं कुटुंब राजकारणात सक्रीय आहेत. निहार ठाकरेंच्या वडिलांचं म्हणजे बिंदूमाधव ठाकरेंचं 1996 मध्ये अपघाती निधन झालं होतं. निहार ठाकरे पेशानं वकिल आहेत. ते अद्याप राजकारणात सक्रीय झालेले नाहीत. मात्र एकनाथ शिंदेंच्या पाठिंबा दिल्यानंतर शिंदेंना जी काही कायदेशीर मदत लागेल. ती सुद्धा आपण करण्यास तयार असल्याचं निहार ठाकरेंनी म्हटलंय.

Published on: Aug 02, 2022 12:10 AM