Special Report | मुंबईत मविआचं जमलं तर लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?

Special Report | मुंबईत मविआचं जमलं तर लोकसभेच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार?

| Updated on: May 19, 2023 | 7:47 AM

VIDEO | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना मुंबईत मविआतील जागा वाटप कसं होणार? बघा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी निवडणुका एकत्रित लढण्याचं म्हटलंय पण मुंबईतील लोकसभांपैकी ३ जागांवर काँग्रेसने दावा केलाय. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मविआमधील जागा वाटप कसं होणार? आणि सध्या मुंबईत असलेल्या सहा लोकसभेच्या जागांचं चित्र नेमकं कसं आहे… महाराष्ट्रात आतापासून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. संभाव्य मविआचा जागावाटपाचा प्रयोग झाल्यास भाजपला रोखण्यासाठी तीनही पक्ष चाचपणी करताय. मात्र दरम्यान जागांवर वादाची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत लोकसभेचे एकूण ६ मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन शिवसेनेने आणि तीन भाजपने जिंकल्या होत्या. तर काँग्रेस राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नव्हती. दक्षिण मुंबईमध्ये सध्या शिंदे गटातील राहुल शेवाळे हे खासदार आहेत. तर याठिकाणी ठाकरे गटाच्या युतीत असलेले प्रकाश आंबेडकर स्वतः लोकसभा लढणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे विशाखा राऊत यांचंही नाव चर्चेत आहेत. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार आहेत तर काँग्रेसकडून संजय निरूपम यांच्या नावाची चर्चा आहे. यासह उत्तरमध्य मुंबईत भाजप कडून पूनम महाजन विरूद्ध काँग्रेसकडून प्रिया दत्त उतरणार आहेत. तर उत्तर पश्चिम मुंबईत बाप विरूद्ध बेटा गजानन किर्तीकर आणि अमोल किर्तीकर हे लढणार असल्याची शक्यता वर्तविली जातेय.

Published on: May 19, 2023 07:47 AM