कॉलेज ऑनलाईन, परीक्षा ऑफलाईन तरी आम्ही कहर केला!- विद्यार्थी

“कॉलेज ऑनलाईन, परीक्षा ऑफलाईन तरी आम्ही कहर केला!”- विद्यार्थी

| Updated on: Jun 08, 2022 | 5:15 PM

फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी निकाल लागल्यावर जल्लोष केलाय. ऑनलाईन कॉलेज आणि अचानक ऑफलाईन परीक्षा झाल्या पण तरी आम्ही कहर केला अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागला, परीक्षा ऑफलाईन द्यावी लागली.

पुणे: बारावीचा निकाल (HSC 2022 Results) लागलाय. 94.22 टक्के राज्याचा निकाल लागलाय. यावर्षी सुद्धा दरवर्षीप्रमाणे निकालात मुलींनी बाजी मारलीये. फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी (Fergusson College Students) निकाल लागल्यावर जल्लोष केलाय. ऑनलाईन कॉलेज आणि अचानक ऑफलाईन परीक्षा झाल्या पण तरी आम्ही कहर केला अशी विद्यार्थ्यांची भावना आहे. सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागला, परीक्षा ऑफलाईन (Offline Examination) द्यावी लागली. खूप सारे बदल झाले पण तरीही निकाल मनासारखा लागलाय असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय. आढावा घेतलाय आमच्या पुण्यातल्या प्रतिनिधी अश्विनी सातव डोके यांनी…

 

 

Published on: Jun 08, 2022 05:15 PM