नो डाऊट | सरकार पाच वर्षे चालणारःहसन मुश्रीफ
महाविकास विकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार त्यामध्ये नो डाऊट असे सांगत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली.
महाविकास विकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार त्यामध्ये नो डाऊट असे सांगत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांनी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत शेतकऱ्यांचे वीज बिल, सरकारची आर्थिक परिस्थिती, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि कोल्हापुरची अस्मिता असलेला जयप्रभा स्टुडिओविषयी चर्चा केली. राजू शेट्टी यांच्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, राजू शेट्टी आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची बैठक घडवून त्याविषयी चर्चा करुन हा शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो असे सांगितले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलताना स्पष्ट केले की, 23 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, त्यानंतर कोरोनामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती कोलमडली असून सरकार शेतकऱ्यांविषयी सकारात्मक विचार करत आहे, असे सांगितले.