Wardha | घराची भिंत कोसळून पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा जखमी; वर्ध्याच्या आर्वीमधील घटना
वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील दहेगाव (गोंडी) येथे घराची भिंत कोसळून पती पत्नीचा मृत्यू झालाय. मुसळधार पावसाने पहाटेच्या सुमारास रामकृष्ण चौधरी यांच्या घराची अचानक भिंत कोसळली. या दुर्घटनेत पत्नी-पत्नीचा मृत्यू झालाय. झालेल्या दुर्घटनेमुळे गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पती पत्नीचा मृत्यू,
राज्यभरात गेले दोन दिवस तुफान पाऊस झाला. दहेगावमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज पहाटेच्या सुमारास भिंत कोसळून ही दुर्घटना घडली.. मागील चार दिवसांपासून खरांगणा शिवारात पाऊस होत आहेय. बुधवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती… पहाटेच्या सुमारास रामकृष्ण चौधरी यांच्या घराची अचानक भिंत कोसळली.
नागरिकांनी घटनेची माहिती मिळताच भिंत बाजूला करत सर्वांना बाहेर काढले. घटनेत ज्योती रामकृष्ण चौधरी यांचा जागीच तर रामकृष्ण चौधरी यांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. या दुर्घटनेत मुलगा आदित्यही जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमीला वर्धा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातीय.