नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्या?

नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्या?

| Updated on: Aug 12, 2023 | 6:12 PM

VIDEO | केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरी भेट देऊन त्यांची समजूत काढली, गडकरी यांच्या भेटीनंतर मेधा कुलकर्णी नेमकं काय म्हणाल्या...

पुणे, १२ ऑगस्ट २०२३ | पुण्यात भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी काल फेसबुकवर पोस्ट टाकून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर पुणे भाजपमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. मेधा कुलकर्णी यांचं नाराजी असणं भाजपसाठी हिताचं नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: मेधा कुलकर्णी यांची त्यांच्या घरी जावून भेट घेतली आहे. नितीन गडकरी यांच्याकडून मेधा कुलकर्णी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान, मेधा कुलकर्णी यांच्या नाराजीची दखल नितीन गडकरी यांनी घेतली. नितीन गडकरी यांनी मेधा कुलकर्णी यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यांनी मेधा कुलकर्णी यांची समजूत काढली. गडकरींनी मेधा यांना पक्षातील वरिष्ठांना भेटून विषय संपवण्याची सूचना केली. “नितीन गडकरी घरी येऊन गेले याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आशीर्वाद दिले. वरिष्ठ मला वेळ देणार आहेत . त्या वेळेला मी वरिष्ठांशी बोलणार आहे. यापेक्षा जास्त आज मी काही बोलणार नाही. मला वेळ दिलेली आहे आणि स्वतः गडकरीही आज मला भेटून गेले आहेत”, अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली.

Published on: Aug 12, 2023 06:12 PM