'माझा कोणत्याच पक्षाशी संबंध नाही, फक्त...', राजू शेट्टी यांचं मोठं विधान

‘माझा कोणत्याच पक्षाशी संबंध नाही, फक्त…’, राजू शेट्टी यांचं मोठं विधान

| Updated on: Jan 16, 2023 | 11:45 AM

माझा आता शिंदे-फडणवीस सरकार आणि कोणत्याच पक्षाशी संबंध नाही, असे का म्हणाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी?

नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून सक्तीची वसूली सुरू आहे. मात्र यामध्ये काही थकबाकीदारांना वगळता जिल्हा बँकेने गरिब, सामान्य शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला. यासंदर्भात काल नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची बैठक झाली. मात्र या बैठकीत कोणत्याही समस्येचे निराकरण झालं नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना मोर्चावर ठाम आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले, दादासाहेब भुसे यांच्याशी बैठक झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितले की, हा निर्णय शासनाचा आहे. सहकार मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलेल असे त्यांनी आश्वासन दिले. आमची एकच मागणी आहे, सर्वप्रथम सक्तीची वसुली थांबवा, शेतकरी कर्ज भरायला तयार आहे तसा पर्याय त्यांना उपलब्ध करून द्यावा. या मागण्या पालकमंत्री असलेले दादा भुसे घेऊ शकत नाही, त्यामुळे या मागण्या, प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी द्यावा. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सोडल्याचे सांगितले. माझा आता शिंदे-फडणवीस सरकारशीही संबंधित नाही. मी आता कोणत्याच पक्षाशी संबंधित नाही, फक्त आणि फक्त शेतकऱ्यांशी संबंधित असल्याचे स्पष्ट केले आहे.

Published on: Jan 16, 2023 11:45 AM