'मी नाराज नाही'; मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण

‘मी नाराज नाही’; मंत्रिमंडळ विस्तारावर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण

| Updated on: Aug 09, 2022 | 1:14 PM

राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली.

“आजचा मंत्रिमंडळ विस्तार होताना सर्वजण आनंदी होते. वातावरण नेहमी असंच राहणार आहे. मी नाराज नाही. आम्ही ज्यावेळी उठाव केला होता, तेव्हा ज्यांनी आमची साथ दिली त्यांना या पहिल्या फेरीमध्ये संधी दिली आहे. दुसऱ्या विस्तारात इतर अनेकांचा समावेश होईल”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली. राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार अखेर आज सकाळी 11 वाजता राजभवनावर पार पडला. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी 30 जून रोजी झाला होता. तेव्हापासून गेले सव्वा-दीड महिना मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू होती.

Published on: Aug 09, 2022 01:14 PM